Dr. Pramod Patil

Education :

  • MBBS – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur
  • MD (Physiology) – Bharati Vidyapeeth, Pune
  • Diploma in Mountaineering and Allied Sports (DMAS) – Savitribai Phule Pune University

Current Position :

  • Head of Department & Consultant Doctor – BILD Exercise Clinic, Deenanath Mangeshkar Hospital, Pune
  • Head of Department & Consultant Doctor – Posture Pain Clinic, Deenanath Mangeshkar Hospital, Pune
  • Head of Department & Consultant Doctor – High Altitude Mountaineering Hypoxic Training Center, Deenanath Mangeshkar Hospital, Pune

Speciality :

  • Exercise treatment for joint pain, osteoarthritis, and spine-related problems
  • Fitness planning for older adults and special populations
  • Posture correction for ergonomic computer and gadget use
  • Exercise planning for diabetes, hypertension, PCOD, and obesity
  • Osteoporosis and postmenopausal health management
  • Return-to-sports rehabilitation & strength conditioning

Work Experience :

  • 10+ years clinical experience in exercise-based treatment
  • High-altitude acclimatization training using hypoxic chamber
  • Fitness analysis of thousands of patients across age groups
  • Sports injury rehabilitation for athletes
  • Worked with Dr. Rajiv Sharangpani (Sports Medicine Specialist)
  • Research collaboration with IISER Pune (Exercise, Diabetes, Darwinian Medicine)

Selected Achievements :

  • First Indian doctor to complete DMAS
  • Best Trainee Award – Nehru Institute of Mountaineering
  • Member – Medical Committee, Maharashtra State Olympic Association
  • Best Research Award – International Geriatric Medicine Conference

Academics & Publications

  • Co-author: Madhumeh: Binsakharechi Theory
  • Multiple research publications on exercise
  • Chief Mentor – “Exercise as Medicine” certification for doctors
  • Faculty – DMAS (SPPU & GGIM)
  • Faculty – Geriatric Fitness Trainer Course

Website :

www.bildclinic.com

Non-Academic Interests :

  • Moth and spider research with Ecological Society, Pune
  • Co-author: Moths of Pune
  • Rock climbing in Sahyadri mountain range
  • Insect macro photography

————————————————————————————————————————————

डॉ. प्रमोद पाटील

 

शिक्षण :

  • एम.बी.बी.एस., राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर
  • एम.डी. फिझीओलॉजी (शरीरक्रियाशास्त्र), भारती विद्यापीठ, पुणे
  • डिप्लोमा इन माउंटेनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (पर्वतारोहण आणि संबंधित खेळ पदविका) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

सध्याचे काम :

  • विभाग प्रमुख, आणि कन्सल्टन्ट डॉक्टर, बिल्ड एक्सरसाइज क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे
  • विभाग प्रमुख, आणि कन्सल्टन्ट डॉक्टर, पोश्चर पेन क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे
  • विभाग प्रमुख, आणि कन्सल्टन्ट डॉक्टर, हाय अल्टीट्यूड माउंटेनियरिंग हायपॉक्सिक ट्रेनिंग सेंटर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे

विशेष प्राविण्य :

  • सांधेदुखी, संधिवात (ऑस्टिओअर्थ्रायटिस) आणि मणक्याशी संबंधित दुखण्यावरील व्यायाम उपचार.
  • वयस्कर व्यक्तींच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठीचे सुरक्षित आणि शास्त्रीय व्यायाम उपचार.
  • संगणक वापराच्या पोश्चरमधील शास्त्रीय सुधारणा (अर्गोनॉमिक वर्क स्टेशन पोश्चर करेक्शन).
  • मधुमेह, उच्च रक्तदाब, पी.सी.ओ.डी., लठ्ठपणा यासारखे जीवनशैलीजन्य विकार असताना करावयाचे व्यायाम.
  • रजोनिवृत्ती (मेनोपॉज), हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) आणि स्नायूंच्या कमकुवतपणासाठीचे व्यायाम उपचार .
  • क्रीडापटूंसाठीचे रिहॅबिलिटेशन, ताकदीचे आणि दुखापतीनंतर पुन्हा खेळ सुरु करण्याच्या आधीचे व्यायाम उपचार (रिटर्न-टू-स्पोर्ट्स ट्रेनिंग).

कामाचा अनुभव :

  • सांधेदुखी, ऑस्टियोआर्थरायटिस आणि मणक्याशी संबंधित दुखण्यावरील व्यायाम उपचारांच्या क्षेत्रात तब्बल १० वर्षांचा वैद्यकीय अनुभव.
  • अतिउंचावरील (हिमालयातील) ट्रेकसाठी अनेक ट्रेकर्सना हायपोक्सिक चेंबरमध्ये अनुकूलनासाठीचे (ॲक्लमटाईजेशन) प्रशिक्षण.
  • विविध वयोगटातील हजारो रुग्णांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे विश्लेषण, व त्यांच्या तंदुरुस्तीच्या व्यायामाचे नियोजन.
  • विविध खेळ प्रकारातील खेळाडूंच्या दुखापती व ऑपेरेशन नंतर पुन्हा खेळात परतण्यासाठीचे व्यायाम उपचार (रिटर्न-टू-स्पोर्ट्स ट्रेनिंग).
  • प्रसिद्ध क्रीडावैद्य विशेषज्ञ आणि सांधेदुखीवरील व्यायामतज्ञ, डॉ. राजीव शारंगपाणी, यांच्याबरोबर अनेक वर्ष कामाचा अनुभव.
  • डॉ. मिलिंद वाटवे यांच्यासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथे व्यायाम, डार्विनियन वैद्यकशास्त्र, शारीरिक तंदुरुस्ती आणि मधुमेहाशी संबंधित संशोधन.

निवडक कामगिरी :

  • डिप्लोमा इन माउंटेनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (DMAS) ही गिर्यारोहणातील पदविका पूर्ण करणारे पहिले भारतीय डॉक्टर.
  • उत्तरकाशी येथील प्रतिष्ठित – नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (NIM) येथील बेसिक माउंटेनियरिंग कोर्सचे सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी पुरस्काराने सन्मानित (best trainee award).
  • महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन (MOA) च्या वैद्यकीय समितीचे सदस्य.
  • जेरियाट्रिक मेडिसिनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरीरसंतुलन (balance) आणि स्नायूंच्या ताकदीतील संबंध या संशोधनकार्याला सर्वोत्तम संशोधन पुरस्कार.

शैक्षणिक कार्य आणि प्रकाशने :

  • मधुमेह: बिनसाखरेची थिअरी या मधुमेहावरील मराठी पुस्तकाचे सह-लेखन.
  • व्यायाम विषयक शोध निबंधांचे लेखन.
  • डॉक्टरांसाठीच्या – “एक्सरसाइज ॲज अ मेडिसिन, फिटनेस ॲज अ लाइफस्टाइल” (Exercise as a medicine, Fitness as a lifestyle) या सर्टिफिकेट कोर्सचे मुख्य मार्गदर्शक (chief mentor).
  • रोटरी क्लब ऑफ पुणे, पर्वती आयोजित तंदुरुस्ती विषयक जागरूकता व्याख्यानमालेचे मार्गदर्शक (chief mentor).
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (GGIM) आयोजित डिप्लोमा इन माउंटनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (DMAS) कोर्स चे मार्गदर्शक सदस्य (faculty member).
  • पुण्यातील ‘चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन’ आयोजित जेरियाट्रिक फिटनेस ट्रेनर सर्टिफिकेट कोर्सचे मार्गदर्शक सदस्य (faculty member).

वेबसाइट :

  • बिल्ड एक्सरसाइज क्लिनिक (BILD Exercise Clinic) – www.bildclinic.com

इतर छंद :

  • इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे या संस्थेसोबत पुण्यातील पतंग (moths) आणि कोळी (spider) यावर संशोधन.
  • इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे या संस्थेद्वारे प्रकाशित “मॉथस् ऑफ पुणे” (पुण्यातील पतंग) इंग्रजी क्षेत्रमार्गदर्शक पुस्तकाचे (field guide) सह-लेखन.
  • गिरीप्रेमी संस्थेद्वारे आयोजित सह्याद्रीतील अनेक कातळ व सुळक्यांवर यशस्वी प्रस्तरारोहण मोहिमा (rock climbing expedition).
  • कीटकांचे सूक्ष्म छायाचित्रण (insect macro photography).